हो, अगदी बरोबर! Import Export चा व्यवसाय म्हटला की आपल्या मनात लगेचच एक मोठं, भव्यदिव्य चित्र उभं राहतं जणू काही फक्त मोठ्या उद्योगपतींसाठीच हा व्यवसाय असतो.
मोठाले कंटेनर, परदेशातील क्लायंट, विमानतळावर मालाची चढ-उतार, करोडो रुपयांचं गुंतवणूक भांडवल, आणि समुद्र किनाऱ्यावर असलेली मोठी बंदर
पण सत्य हे आहे की आजच्या डिजिटल युगात हे चित्र खूप बदललं आहे.
आज कोणताही सामान्य माणूस अगदी तुमच्यासारखाही फक्त २०-५० हजार रुपयांपासून Import Export चा व्यवसाय सुरू करू शकतो. तोही घरबसल्या, बिनातणाव.
म्हणूनच, हे पूर्वग्रह आपण आता बाजूला ठेवायला हवेत. कारण तुम्ही ज्या व्यवसायाला “मोठ्यांसाठीच आहे” असं समजत होतात, तो व्यवसाय आज तुमच्या दारात उभा आहे संधी म्हणून!
हवी फक्त सुरुवात करण्याची तयारी, थोडं शिकण्याचं धाडस, आणि योग्य मार्गदर्शन!
Export व्यवसायात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणता प्रॉडक्ट Export करायचा याची योग्य निवड.
बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं “आपल्याकडे शेती आहे, माल भरपूर आहे, तर आपण तोच Export करूया.”
किंवा “मित्रांकडून माल स्वस्त मिळतोय, चल तोच पाठवूया परदेशात.”
पण मित्रांनो, असे चालणार नाही.
Export व्यवसाय भावनांवर चालत नाही, तो मार्केट डिमांडवर चालतो. तुम्ही जो प्रॉडक्ट पाठवणार आहात, त्याला विदेशी बाजारात खरंच मागणी आहे का, हे तपासणं सगळ्यात आधी गरजेचं आहे.
जर तुम्ही चुकीचा प्रॉडक्ट निवडला, तर पैसेही अडकतील, वेळही जाईल आणि नुकसानही होईल.
Register your company तुमची कंपनी नोदवा
व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःच्या व्यवसायाची नोंद करावी लागणार आहे. कोणत्याही बेसिक प्री-मायसेसच्या आधारे तुम्ही हा इम्पोर्ट Export बिजनेस स्टार्ट करू शकता.
तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार व्यवसायाची नोंद, Proprietorship, LLP किंवा private limited यापैकी एक करू शकता. जर तुमच्याकडे ऑफिस नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या नावावर कंपनी रजिस्टर करू शकता.
Export साठी भारत देशात वेगवेगळ्या उत्पादनासाठी वेगवेगळे बोर्ड तयार केले गेले आहेत. उदाहरणार्थ मसाले निर्यातीकरता SPICES BOARD आहे.
अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील उत्पादन Export साठी वेगवेगळे बोर्ड काम करतात. जो प्रॉडक्ट तुम्ही एक्स्पोर्ट करणार आहात, त्यासंबंधीत बोर्ड एथॉरिटीचे तुम्हाला आरसीएमसी प्रमाणपत्र लागणार आहे.
Export साठी तुम्हाला अशा वस्तूंची निवड करावी लागणार आहे, जे देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यांना परदेशात भरपूर मागणी असावी. म्हणजे या ठिकाणी दोन्ही मुद्दे महत्त्वाचे आहेत एक उपलब्धता आणि दुसरी परदेशात असणारी मागणी.
आपला भारत देश मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन करत आला आहे. आपला भारत देश गेली अनेक दशके परदेशात कापूस निर्यात करत आला आहे.
गारमेंट्समध्ये तुम्ही जर कापूस निर्यातीचा विचार करत असाल, तर तुम्हाला फार कमी नफ्यावर समाधान मानावे लागेल. अधिक नफा मिळवण्यासाठी गारमेंट्समधील फिनिशिड प्रॉडक्ट्स Export करा.
फिनिशिड प्रॉडक्टवर मार्जिन अधिक मिळते त्याचे कारण असे कि अशा वस्तूंमध्ये व्हॅल्यू ॲड झालेली असते,
त्यामुळे मार्केटमध्ये त्याची किंमत देखील अधिक मिळते. गारमेंट्समध्ये तुम्ही तयार कापड, ड्रेस मटेरियल, तयार कपडे असे प्रॉडक्ट्स Export करू शकता.
परदेशात बेडशीट, कर्टेन्स आणि नॅपकिन्स सारखे नॉन वेअरेबल प्रॉडक्ट Export करता येतात. अमेरिका, युरोप देशात या वस्तूंना प्रचंड मागणी आहे.
परदेशात भारतातून मोठ्या प्रमाणात मध Export होतो. मधाला परदेशात चांगली मागणी आहे. भारत देशात मध नैसर्गिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे तो परदेशात एक्स्पोर्ट पाठवला जातो.
आजकाल परदेशात flavoured honey ला जास्त मागणी आहे. नैसर्गिक शुद्ध फ्लेवर्ड मध मिळवण्यासाठी वेगवेगळ्या फुलांच्या लागवड परिसरात मधुमक्षीपालन केले जाते.
उदाहरणार्थ जर rose flavoured honey मिळवण्यासाठी गुलाब शेतीमध्ये मधुमक्षीपालन केले जाते. उदाहरणार्थ जर गुलाब फ्लेवरचा मध मिळवायचा असेल तर गुलाब शेतीमध्ये मधुमक्षीपालन केले जाते.
तुम्ही जर नैसर्गिकरित्या शुद्ध मिळवलेला मध Export साठी निवडला तर तो परदेशी मार्केटमध्ये स्थिर राहील. कारण परदेशात नैसर्गिकरित्या शुद्ध मध फार कमी मिळतो.
भारत देशाला फार वर्षापासून आयुर्वेदिक उत्पादनांचा वारसा आहे आणि ग्रंथांमध्ये, साहित्यांमध्ये आयुर्वेदिक वनस्पतींचा उल्लेख आढळतो. त्यामुळे आयुर्वेदिक उत्पादने मिळण्याचे एकमेव स्त्रोत भारत देश मानला जातो.
ज्यामध्ये अश्वगंधा, शतावरी, तुलसी व ब्राह्मी अशा आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश होतो. पश्चिमी देशात अशा औषधी वनस्पतींना मोठी मागणी आहे.
अशी अनेक आयुर्वेदिक उत्पादने तुम्ही कच्च्या स्वरूपात किंवा प्रक्रिया केलेली उत्पादने पश्चिमी देशात Export करू शकता.
प्रॉडक्ट निवडण्यापासून या इंडस्ट्री मधील सर्व प्रक्रिया ही सिस्टीम ओरिएंटेड आहेत.
प्रॉडक्ट तयार होण्यापासून, त्याचे पॅकेजिंग होण्यापासून, प्रॉडक्ट लोडिंगवेळी त्याचे डॉक्युमेंट्स तयार होतात व पुढे तो माल शिपमध्ये लोड केला जातो व शेवटी तो ज्या देशात विकला जाणार आहेत त्या देशातील पोर्टवर उतरवला जातो.
ही एक एक्स्पोर्टची प्रक्रिया आहे ही पूर्ण प्रक्रिया तुम्हाला शिकावी लागणार आहे.
जर तुम्ही तरुण असाल. जर तुमच्याकडे भरपूर वेळ असेल, तर तुम्ही Export बिजनेस चालवणाऱ्या फर्ममध्ये दोन ते तीन वर्ष नोकरी करा.
तुमच्या आयुष्यातील ही दोन तीन वर्षे तुमच्या एक्स्पोर्ट बिझनेससाठी फार महत्वपूर्ण ठरणार आहेत.
अशा फर्ममध्ये काम केल्यामुळे तुम्हाला Export व्यवसायाचे ओव्हरऑल स्ट्रक्चर लक्षात येईल व या इंडस्ट्रीतील बारकावे तुमच्या लक्षात येतील.
Product Export करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा buyer कोण आहे हा अगोदर शोधता आलं पाहिजे. समजा तुम्हाला मसाले Export करायचे आहेत किंवा गारमेंटस Export करायचे आहेत.
तर त्यासाठी तुम्हाला परदेशातील होलसेलर, डीलर आणि सुपर मार्केटर्स कोण आहेत हे शोधावे लागतील.
आता तुम्हाला होलसेलर, डीलर आणि सुपर मार्केटर आहे यांची यादी मिळवायची आहे. यांची यादी मिळवण्यासाठी तुम्हाला देश विदेशातील एक्झिबिशनमध्ये सहभागी व्हायचं आहे.
या ठिकाणी तुम्हाला बायरची यादी सहज मिळेल. तसेच B2B वेबसाईटवर देखील बायरची यादी मिळेल.
जर तुम्हाला देशातच प्रॉडक्ट विकायचे असतील तर तुम्ही प्रत्यक्ष होलसेलर, डीलर किंवा सुपर मार्केटर यांच्याकडे डीलसाठी भेट देऊ शकता.
जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केलेली कृषी प्रदर्शनात सहभाग घेऊन बायरची यादी काढू शकता. तुम्हाला गुगलवर देखील बायरची यादी मिळेल.
मुंबई दिल्ली यांसारख्या शहरात, अमेरिका यांसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये मोठमोठे ट्रेड फेअर्सच आयोजन केले जाते. अशा ट्रेड फेअरमध्ये तुम्ही पार्टिसिपेट होऊन तुमच्या Export बिजनेससाठी ग्राहक शोधू शकता.
परदेशातून आयात केलेल्या वस्तू स्वदेशात विकणे किंवा देशात तयार होणाऱ्या वस्तू परदेशात पाठवणे हा व्यवसाय जास्त पैसा मिळवून देणारा व्यवसाय ठरत आहे.
यालाच इम्पोर्ट इक्स्पोर्टचा व्यवसाय म्हटले जाते. या व्यवसायात अनेक संधी आहेत. हा व्यवसाय असा आहे या व्यवसायाला कोणतेही लिमिट नाही तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहून हा व्यवसाय सुरु करू शकता.
Register now and take the first step toward your EXIM success!
Privacy & Policy | Est. 2019 | Rode Exports and Services Pvt Ltd © 2023 All Rights Reserved.| Cancellation & Refund Policy | Terms & Conditions | Contatc Us
WhatsApp us